फलटण येथे उद्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे’ आयोजन

फलटण : शहरातील सर्वसामान्य जनता, विदयार्थी व महिला यांचे महसूल विभागांतर्गत व इतर विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण व जनतेच्या तक्रारी निकाली काढण्यासाठी व सर्व शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली घेण्याकरीता प्रशासनाच्या वतीने फलटण येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे’ आयोजन करण्यात आल्याची माहिती तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
शुक्रवार दि. ८ मे रोजी सकाळी ११ वाजता बी.एस.एन.एल. ऑफिस शेजारील नगरपरिषद सभागृह येथे या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शिबिरामध्ये जिवंत ७/१२ मोहिम ( वारस नोंद, लक्ष्मी मुक्ती, अपाक नोंदी, एकुम्या नोंदी इ . ) ७/१२ व ८ अ वाटप करणे, सामाजिक अर्थसहाय्य योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे अर्ज भरुन घेणे व लाभ मंजूर करणे, तुकडेबंदी कायद्याविरुध्द व्यवहार व हस्तांतरण बाबत (अकृषिक जमीनी) गावनिहाय यादी तयार करणे, मंडळ स्तरावरील सर्व शाळांमध्ये दाखले शिबीर घेऊन विद्यार्थ्यांना दाखले वाटप करणे, प्रलंबित फेरफार निकाली काढणे, लोकसेवा हक्क कायदा तात्काळ सेवा उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी /अधिवास प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रामणपत्र अर्ज स्विकरणे व प्रमाणपत्र वितरीत करणे, भोगवटादार वर्ग २ जमीन वर्ग भोगवटादार १ मध्ये नियमानुसार परावर्तीत करणे, नविन अकृषक तरतुदीसंदर्भातील सुधारणाबाबत मार्गदर्शन करणे, भूसंपादन केलेल्या अकृषक परवानगी दिलेल्या प्रकरणांची कमी जास्त पत्रके करुन गाव दप्तर अद्यावत करणे, एक खिडकी व्यवस्था राबविणे, ई – मोजणी (प्रॉपर्टी कार्ड वाटप /वारस नोंदी / नकाशा वाटप), अग्रीस्टॅक (फार्मर आय.डी), पी.एम. किसान (लॅन्ड सिडींग, आधार सिडींग, ई. के.वाय.सी.) कामकाज, महसूल व्यतिरिक्त अन्य शासकीय कार्यालयीन कामकाज या प्रमाणे सेवा पुरविण्यात येणार आहेत. सदर शिबीरामध्ये शहरातील सर्व नागरिक, लोकप्रतिनिधी, महिला बचत गट, शहरामधील तरुण मंडळे यांनी सहभागी होऊन सदर उपक्रम यशस्वी करावा असे आवाहन प्रशासना मार्फत करण्यात आले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!