गिरवीच्या उपसरपंच पदी नवनाथ जाधव बिनविरोध

फलटण : फलटण तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या गिरवी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी नवनाथ विठ्ठल जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे.
गिरवी ग्रामपांचायतीचे उपसरपंच संतोष बबन मदने यांनी ठरलेल्या कालावधी नंतर आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता. सदर रिक्त उपसरपंच पदासाठी नवनाथ विठ्ठल जाधव यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली. बैठकीच्या अध्यक्षपदी लोकनिर्वाचित सरपंच वैशाली राजेंद्र कदम होत्या. यावेळी बैठकीस ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. सदर निवडीनंतर नूतन उपसरपंच जाधव यांचा सरपंच वैशाली कदम व ग्रामपंचायत सदस्यांनी विशेष सत्कार केला.
या निवडीबद्दल नवनाथ जाधव यांचे श्रीमती शारदादेवी कदम, जिल्हा परिषद सदस्य सह्याद्री कदम आणि गिरवी ग्रामस्थांमधून अभिनंदन व्यक्त होत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!