फलटण तालुक्यात ५१ गावात टंचाई घोषित : त्यापैकी ५ गावे व त्याखालील २७ वाड्यावस्त्यावर टँकर सुरु

फलटण : उन्हाची तीव्रता वाढत असताना पावसाने ओढ दिल्याने तसेच यंदा उन्हाळी पाऊस न झाल्याने तालुक्यात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली असून प्रामुख्याने पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होत असताना महसूल खात्याने तालुक्यातील ५२ गावात टंचाई परिस्थिती घोषित केली असून त्यापैकी ५ गावे आणि २७ वाड्या – वस्त्यांवरील जनावरे व लोकवस्तीच्या पिण्याच्या पाण्यासाठी टँकर उपलब्ध करुन दिले असल्याची माहिती प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर व तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी दिली आहे.
टंचाई घोषित आणि टँकर सुरु करण्यात आलेल्या गावांमध्ये बागायती पट्ट्यातील गावांचाही समावेश असल्याने पावसाने आणखी ओढ दिली तर टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार अलनिनोच्या प्रभावामुळे पाऊसमान कमी होण्याची तसेच केवळ ९२ टक्केच पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असल्याने अगामी काळात टंचाईची तीव्रता आणि टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी ३२ गावात टंचाई घोषित करण्यात आली होती, त्यामध्ये धुळदेव, झिरपवाडी, सोनवडी बुद्रुक, सोनगाव, माळेवाडी, शिंदेमाळ, आंदरुड, नांदल, ढवळेवाडी (आसू), टाकळवाडे, मानेवाडी, मिरगाव, दऱ्याचीवाडी, मिऱ्याचीवाडी, दालवडी, कोऱ्हाळे, कापडगाव, पवारवाडी, ताथवडा, चौधरवाडी, फरांदवाडी, बिबी, वाघोशी, पिराचीवाडी, जिंती, आळजापूर, आदर्की बुद्रुक, मलवडी, ठाकूरकी, हनुमंतवाडी, मठाचीवाडी, होळ या ३३ गावांचा समावेश आहे.
दि. ३० मार्च २०२६ रोजी १० गावात टंचाई घोषित करण्यात आली होती, त्यामध्ये खामगाव, ढवळ, झडकबाईचीवाडी, जावली, कापशी, टाकूबाईचीवाडी, मिरढे, सरडे, आदर्की खुर्द आणि हिंगणगाव या १० गावांचा समावेश आहे.
दि. ५ जून २०२६ रोजी ९ गावात टंचाई घोषित करण्यात आली आहे, त्यामध्ये गोळेगाव पुनर्वसन, जाधवनगर, तांबवे, वडगाव, सासवड, घाडगेवाडी, मुळीकवाडी, दुधेबावी आणि वडले या ९ गावांचा समावेश आहे.
दि. ६ जून २०२६ पासून खालील गावे व वाड्यावस्त्यांवर टँकरद्वारे जनावरे व लोकवस्तीसाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. दुधेबावी व ११ वस्त्या, वाघोशी, सासवड व ५ वस्त्या, मानेवाडी व ४ वस्त्या आणि मिरढे व ७ वस्त्यांना टँकर सुरु करण्यात आले आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!