संपर्कहीन व एसीत वावरणाऱ्या उमेदवारांना मतदारच घरी बसवतील : प्रियांका निकम

फलटण : विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार रामराजे नाईक निंबाळकर व फलटणकर यांचे एक वेगळे नाते आहे. राजकीय स्थित्यंतरे होत असली तरीही जनता मात्र आ. रामराजे यांच्या पाठीशीच ठाम आहे, त्यामुळे फलटण नगर परिषदेत शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस व कृष्णा भीमा विकास आघाडीचे नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार बहुमताने विजयी होतील असा विश्वास व्यक्त करण्याबरोबरच यापूर्वी अनेकवेळा निवडून आल्यानंतरही आपल्या प्रभागात कुठलाही जनसंपर्क न ठेवणाऱ्यांना प्रभाग क्रमांक अकरामध्ये मते मागण्याचा अधिकार नाही अशी टीका प्रियांका युवराज निकम यांनी केली.
फलटण नगर परिषदेच्या निवडणुकीत आ. रामराजे नाईक निंबाळकर, संजीवराजे नाईक निंबाळकर व रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस व कृष्णा भीमा विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक ११ मधून मी व माझे सहकारी उमेदवार दादासाहेब चोरमले हे निवडणूक लढवीत आहोत. आमच्या निकम घराण्याला सामाजिक सेवेचा वारसा आहे. माझे सासरे निवृत्त जलसंपदा अधिकारी सुहास निकम व माझे पती युवराज निकम यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करीत असताना, सर्वसामान्य लोकांना दिलासा देण्याचे काम केले आहे. लायन्स क्लब, क्रेडाई, सहजयोग परिवार अशा विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आमचे घराणे लोकसेवा करीत आहे. आपण देखील त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून प्रभाग क्रमांक ११ मध्ये समाजिक कार्याला वाहून घेऊन काम करणार आहोत. आज राजे गटावर विरोधक अनेक चुकीचे आरोप करीत आहेत. वास्तविक आ. रामराजे यांच्या माध्यमातून महत्वपूर्ण पाणी प्रश्नासह असंख्य जनहिताची कामे झाली आहेत. आज अनेक राजकीय स्थित्यंतरे होत असली तरीही जनता मात्र आ. रामराजे यांच्याच पाठीशी ठाम आहे, त्यामुळे व अगामी काळात फलटण शहर सुरक्षित व दहशतमुक्त ठेवण्यासाठी फलटण नगर परिषदेत शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस व कृष्णा भीमा विकास आघाडीचे नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास प्रियांका निकम व्यक्त केला.

निष्क्रिय व संपर्कहीन का राहिलात जनतेला उत्तर द्या..!

फलटण शहरात टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असल्याचा खोटा आरोप विरोधक करत आहेत, वास्तविक राजे गटाच्या माध्यमातून नगरसेविका म्हणून निवडून येत तुम्ही ‘पाणी पुरवठा विभागाचे सभापती पद’ तुम्ही भूषविले आहे. त्यावेळी शहराला स्वच्छ व नियमित पाणी पुरवठा व्हावा म्हणून तुम्ही निष्क्रियच राहिलातच त्याचबरोबर संपर्कहीन देखील राहिलात जनतेने हे चांगलेच लक्षात ठेवले आहे. ‘पैसा वाटा व निवडून या’ हा फंडा आता चालणार नाही. त्यामुळे प्रभाग क्रमांक ११ मध्ये विरोधकांना जनताच पराभवाची धूळ चारेल असा विश्वासही प्रियांका निकम यांनी व्यक्त केला आहे.

👉 आम्ही करणार हे काम

  • प्रभागातील अंतर्गत रस्ते सिमेंट कॉंक्रिटीकरणा चे करणार
  • उपलब्ध ओपन स्पेसमध्ये नाना नानी पार्क व बालोद्यान
  • आवश्यक तेथे नवीन पाणी पाईप लाईन
  • महिला व पुरुषांसाठी स्वच्छता गृह उभारणार
  • प्रभाग क्रमांक ११ मधील जनतेच्या समस्या
    निवारणासाठी स्वतंत्र यंत्रणा उपलब्ध करून
    देणार.
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!