डॉ. सुवर्णा नागठाणे ‘देशरत्न पुरस्काराने’ सन्मानित

सातारा प्रतिनिधी ता. २६ : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय शाखा नागठाणे यांच्या संचालिका ब्रह्मा कुमारी डॉ. सुवर्णा नागठाणे यांना सामाजिक सेवेसाठी “देशरत्न पुरस्कार २०२५” हा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. दिल्ली येथे उत्तर प्रदेशचे श्रम व रोजगार मंत्री रघुराज सिंह यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. चरण सिंह यांच्या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक सेवा, कृषीक्षेत्र, रक्षाक्षेत्र, कला, संस्कृती, शिक्षण विभाग व जनकल्याण अशा विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट योगदान देणाऱ्यांचा “देशरत्न पुरस्कार” देऊन गौरव करण्यात येतो. भारतीय युवा वेल्फेअर असोसिएशन (BYWA) द्वारे या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमाचे नियोजन श्रम व रोजगार मंत्रालय तसेच सामाजिक न्याय तसेच अधिकारिता मंत्रालय आणि भोजन प्रसंस्करण उद्योग मंत्रालय भारत सरकार द्वारे करण्यात येते.

नारी शक्ती पुरस्कारानेही सन्मानित…
विविध हायस्कूल व महाविद्यालयांमध्ये केलेले विद्यार्थी प्रबोधन व महिला व बाल कल्याण विकासासाठी केलेल्या कामाची दखल घेत राजयोग शिक्षिका ब्रम्हाकुमारी डॉ. सुवर्णा नागठाणे यांना नुकतेच ‘नारी शक्ती २०२५’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून प्रसिद्ध नृत्यांगना व अभिनेत्री सुधा चंद्रन यांच्या हस्ते गोवा येथे विशेष कार्यक्रमात त्यांना सदर पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!