फलटणला संस्थान हेरिटेज संगीत महोत्सवाचे आयोजण

फलटण : येथील ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक वारशाची जपणूक करण्यासाठी ‘फलटण संस्थान हेरिटेज संगीत महोत्सव’ प्रतिवर्षी आयोजित करण्यात येत असतो, या वर्षी दि. १७ व १८ एप्रिल रोजी या संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
       शहरातील मुधोजी हायस्कूल येथे सायंकाळी ६ ते ९ या वेळेत हा महोत्सव पार पडणार आहे.
फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम, माळजाई उद्यान समितीचे अध्यक्ष प्रमोद निंबाळकर, मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य वसंत शेडगे आणि कला प्रसारक संस्थेच्या संस्थापिका भाग्यश्री गोसावी यांनी पत्रकार परिषदेत या हेरिटेज संगीत महोत्सवाविषयी माहिती दिली.
     कला प्रसारक संस्था आणि गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स यांच्या प्रयत्नातून सन २०२० पासून फलटण संस्थान हेरिटेज संगीत महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून आजवर सावनी शेंडे, पौर्णिमा धुमाळे, प्रमोद मराठे, अमर ओक, श्रुती भावे यासारख्या नामवंत कलाकारांनी आपल्या कला सादर करून रसिकांची मने जिंकली आहेत. पारंपरिक संगीत नव्या पिढीसाठी सुलभ आणि आकर्षक पद्धतीने सादर केल्यामुळे रसिकांचा प्रतिसादही दिवसेंदिवस वाढत आहे. यंदाच्या महोत्सवात आंतरराष्ट्रीय ख्यातीचा जादूची पेटी हा कार्यक्रम प्रसिद्ध कलाकार आदित्य ओक आणि सत्यजित प्रभू सादर करणार आहेत तसेच आंतरराष्ट्रीय सनई वादक केदार जाधव यांचेही सादरीकरण होणार आहे. याशिवाय युवा कलाकार रसिका वैशंपायन आणि रिॲलीटी शो मधून नाव कमावलेल्या प्रियांका चौधरी-ढेरंगे यांचे गायन तसेच निवेदिता व नंदिता देशपांडे यांचे कथक नृत्य हे महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.
भारतीय शास्त्रीय संगीत ही आपल्या देशाला व जगाला लाभलेली एक अमूल्य देणगी आहे, मात्र काळाच्या ओघात योग्य प्रचार आणि प्रसाराच्या अभावामुळे पारंपरिक संगीत आणि नव्या पिढीमध्ये दरी निर्माण झाल्याचे चित्र आज पहायला मिळत असल्याच्या पार्श्वभूमीवर या संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून फलटणकर रसिक श्रोत्यांनी त्याचा लाभ घेण्याचे व हेरिटेज संगीत महोत्सवा विषयी अधिक माहितीसाठी ९४०५७४६४१९ आणि ९२२५५२५३५२ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्काचे आवाहन आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!