
फलटण : महावितरणने जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी तसेच गाव पातळीवर सर्व्हेक्षण करुन धोकादायक ठरणाऱ्या विद्युत वाहिन्या, उघडे असेलेले डी.पी., फ्युज बॉक्स सुस्थितीत करावेत. तसेच मान्सूनपूर्व कामे तातडीने पूर्ण करून अगामी आठ दिवसात त्याचा अहवाल सादर कारावा अशा, सूचना सातारा जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार यांनी दिल्या.
ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक आज दि. २५ रोजी अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी व ग्राहक संरक्षण परिषदेच्या सचिव वैशाली राजमाने, ग्राहक संरक्षण परिषेचे सदस्य, व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
या वेळी सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना अपर जिल्हाधिकारी इमनादार म्हणाले, विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने करावयाची सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. सातारा शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील अपूर्ण असलेली गटारे ग्रामपंचायत विभागाने तातडीने पूर्ण कारीवत व पावसाळ्यात या ठिकाणी पाणी साठणार नाही याची खात्री करावी. सातारा शहारातअनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याच्या तक्रारी बैठकीत मांडण्यात आल्या यावर रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. तसेच लवकरात लवकर वाहतूक सुरळीत करण्यासाठी नगरपालिका, शहर वाहतूक शाखा आणि प्रादेशिक परीवहन विभाग यांनी एकत्रित बैठक घेऊन याविषयी तोडग काढण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
रिक्षा संघटना आणि ग्राहक परिषद यांची संयुक्त बैठक परिवहन विभागाने घ्यावी व शहरातील सर्व रिक्षांना मीटर बसवण्या बाबतची कार्यवाही करावी तसेच बैठकीत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संबंधित विभागांनी सादर करावा अशा सूचनाही इनामदार यांनी यावेळी दिल्या.

