रिया तिवाटणे व ज्ञानेश्वरी होरणे यांचे यश प्रेरणादायी : महेश खुटाळे

फलटण : “यश मिळवण्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि आत्मविश्वास महत्त्वाचा असतो,” अगामी कारकिर्दीतही याच गुणांना ध्येय, जिद्द व चिकाटीची जोड दिली तर तुम्ही जे ध्येय डोळ्यासमोर ठेवले आहे, त्याची पूर्तता निश्चितपणे झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःचे ध्येय निश्चित करून त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन निवृत्त क्रीडा अधिकारी महेश खुटाळे यांनी केले.
“फलटण तालुका ग्रामीण कासार समाज संवाद व विकास समिती” यांच्या वतीने फलटण येथील रिया तिवाटणे व ज्ञानेश्वरी होरणे यांनी १२ वी मध्ये उल्लेखनीय यश मिळविल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. यावेळी प्रसिद्ध व्यापारी शैलेश होरणे, सागर होरणे, हिराचंद तिवाटणे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

यश हे एका दिवसात मिळत नाही; त्यामागे अनेक दिवसांची मेहनत, त्याग आणि सातत्य दडलेले असते. मोबाईल, सोशल मीडिया आणि विविध आकर्षणांपासून दूर राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित केले तर यश हे नक्की मिळते असे निदर्शनास आणून देत खुटाळे म्हणाले, आजचा सत्कार हा केवळ एका विद्यार्थिनीचा नसून तो मेहनत, जिद्द आणि चिकाटीचा सन्मान आहे. मुलींनी शिक्षणाच्या क्षेत्रात पुढे येऊन मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्याची हिंमत ठेवावी. या यशामुळे विद्यार्थिनींनी केवळ स्वतःचेच नव्हे, तर पालक, शिक्षक आणि संस्थेचेही नाव उज्ज्वल केले आहे. शहरातील इतर विद्यार्थ्यांनीही रिया व
ज्ञानेश्वरी यांच्याकडून प्रेरणा घेऊन शैक्षणिक प्रगती करतील.
सदर यशाबद्दल रिया तिवाटणे व ज्ञानेश्वरी होरणे यांचे राजकीय, शैक्षणिक, सामाजिकसह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन व्यक्त होत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!