
फलटण : ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत फलटण एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटणच्या उद्यानकन्या प्रशिक्षणासाठी सासकल ता. फलटण. जि सातारा येथे दाखल झाल्या असून गावातील मान्यवर व ग्रामस्थ यांच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत सातव्या सत्रातील उद्यानकन्या प्रशिक्षणासाठी दाखल झालेल्या उद्यानकन्या रिया गोदारा, ऐश्वर्या मेटकरी, रक्षिता होर्टी, प्रेरणा कदम, शरयू कोकरे, दिशा सोनवणे, भाग्यश्री कांबळे यांचे स्वागत सासकलच्या उपसरपंच सोनाली मदने, ग्रामविकास अधिकारी अशोक सापते, ग्राममहसुल अधिकारी अंजली धर्माधिकारी, सहाय्यक कृषि अधिकारी सचिन जाधव, पोलिस पाटील दत्तात्रय सोनवलकर, ग्रामपंचायत सदस्य मनोहर मुळीक, हणमंत मुळीक, मोहन मुळीक, लता मुळीक, लक्ष्मी आडके आदी मान्यवरांनी व ग्रामस्थांनी केले. या उद्यानकन्या गावामध्ये पुढील वीस आठवडे वास्तव्यास राहणार आहेत. या कालावधीमध्ये त्या सासकल येथील शेतकऱ्यांना शेती व नवीन तंत्रज्ञान विषयक माहिती देऊन गावामध्ये शेती विषयक विविध उपक्रम व कार्यक्रम राबविणार आहेत. माती परीक्षण, फळबाग लागवड, एकालीक कीड रोग, बीज प्रक्रिया, आधुनिक शेती औजारे वापर, शेतीचा आर्थिक फायदा, जनावरांचे लसीकरण आदीबाबत गावकरी व शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.डी. निंबाळकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु.डी. चव्हाण, कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. ए.आर. पाटील, प्रा. डॉ. जे.व्ही. लेंभे, प्रा. ए.डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे.
