ताथवडे येथे स्व. ॲड. धोंडीराम खरात सर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वृक्षारोपण

फलटण : तालुक्यातील ताथवडे गावामध्ये डसऱ्याक रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन यांच्या वतीने स्व. ॲड. धोंडीराम अर्जुना खरात (निवृत्त प्राचार्य) यांच्या सहाव्या पुण्यतिथी निमित्त तसेच ७६ व्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. वन विभागाच्या क्षेत्रामध्ये शेकडो विविध वृक्षांचे रोपण व बीजरोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
      या कार्यक्रमास संस्थेच्या संचालिका ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात तसेच डॉ. महेशकुमार धोंडीराम खरात उपस्थित होते. वन विभागाचे वनरक्षक सुरज इंकर व वनसेवक गजाबा जाधव यांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी संस्थेचे स्वयंसेवक राजाराम अडसूळ, सुखदेव फुले, पंकज शिंदे, सनी नाळे, श्रीकांत गावडे, अशोक गावडे, वीरसेन सोनवणे, हिम्मतराव खरात तसेच ताथवडे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज असून अशा उपक्रमांमुळे समाजामध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती होत असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!