
फलटण : ग्रामीण जागरूकता कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२६-२७ कार्यक्रमांतर्गत फलटण एज्युकेशन सोसायटीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी मान्यताप्राप्त कृषी महाविद्यालय, फलटण येथील कृषीदूतांचे काळज येथे मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले.
यावेळी गावचे सरपंच संजय गाढवे, ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र डोंबाळे, प्रगतशील शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प कार्यक्रमांतर्गत पुढील दहा आठवड्यांमध्ये कृषीदूत अभिजीत पिसाळ, रोहन माळी, यश पाटील, राहुल पावरा, सुरज शिंदे, अभिषेक राक्षे, साहिल शिंदे हे शेतकरी व ग्रामस्थ यांना शेती विषयक प्रात्यक्षिक, गटचर्चा, जनावरांचे लसीकरण, वृक्षारोपण, शेतकरी शास्त्रज्ञ चर्चा आदी बाबत माहिती देणार आहेत, तसेच अन्य विविध कार्यक्रम राबवणार आहेत. शेतकऱ्यांचे अनुभव त्यांच्या शेती पद्धतीचा सखोल अभ्यासही या कालावधीत कृषीदूत करणार आहेत.
कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. यु.डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस.डी निंबाळकर, समन्वयक प्रा एन.एस. धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस.एम. साळुंखे, प्रा. एन.ए. पंडित, प्रा. जी.बी. अडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे.
