
फलटण प्रतिनिधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये फलटण येथील कुमारी स्नेहल मारुती पवार हिची जलसंधारण अधिकारी वर्ग 2 पदी निवड झाली आहे.
स्नेहल पवार हिचे बारावीपर्यंतचे शिक्षण मुधोजी हायस्कूल व जुनिअर कॉलेज, फलटण येथे झाले असून तिने पुणे येथील सिंहगड कॉलेज मधून बी.ई. सिव्हिल ही पदवी धारण केली आहे. तीचे वडील मारुती जनार्दन पवार यांनी अभियांत्रिकी सेवेमध्ये उच्च पदावर काम केले असून त्यांच्या आई या एक गृहिणी आहेत.
सदर यशाबद्दल स्नेहल पवार हिचे महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार रामराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिपक चव्हाण, फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथ राजे नाईक निंबाळकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
