विजेच्या कडकडाटात ही काळजी घ्या : जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन

फलटण : हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार सातारा जिल्ह्यात ३१ मार्च व १ एप्रिल या कालावधीत विजेच्या कडकडाटात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संतोष पाटील यांनी सातारा जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.
आपण घराबाहेर असताना जर पाऊस सुरु होऊन विजेचा कडकडाट सुरू झाला तर पुढील प्रमाणे सावधानता बाळगावी.

👉 विजांचा कडकडाट होत असताना नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत झाडाखाली आश्रय घेऊ नये. तसेच जनावरांनाही झाडाखाली आश्रय देऊ नये.
👉 लाईटच्या खांबांपासून पासून दूर रहावे.
👉 पाण्यात असाल तर तात्काळ पाण्याच्या बाहेर पडावे.
👉 इलेक्ट्रॉनिक/उपकरणे बंद करा आणि प्लग बाहेर काढून ठेवा.
👉 वादळी वारे वाहत असताना शक्यतो मोबाईलचा वापर टाळावा.
👉 अशा परिस्थितीत नागरिकांनी शक्यतो सुरक्षित ठिकाणचा आसरा घ्यावा.
👉 अशा वातावरणात घराबाहेर पडू नये.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!